शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून फवारणी पंप व सोयाबीन चाळणीसाठी अनुदान

favarni pump electric जिल्हा परिषदेच्या उपकर निधी (सेस फंड) अंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप आणि सोयाबीन चाळणी खरेदीसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत 1,140 शेतकऱ्यांना फवारणी पंप, तर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणी दिली जाणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाईल.

योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

कृषी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 75% अनुदानावर या साहित्यांसाठी अर्ज मागवले होते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, लवकरच त्यांना अनुदान मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांनी 10 मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे:

✅ खरेदी बिल (जीएसटी क्रमांकासह)
✅ बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
✅ अनुदान अर्ज व प्रतिज्ञापत्र
✅ कृषी विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल
✅ साहित्य खरेदीनंतर अधिकाऱ्यांसोबतचा जिओ-टॅग केलेला फोटो

शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शेतीसाठी उपयुक्त साधने सुलभतेने मिळवावीत.

Leave a Comment