ration card online

देशातील गरिबांपर्यंत मोफत अन्न पोहोचवण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो. रेशनकार्ड हे केवळ अन्नासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करू शकता. रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासोबतच तुम्ही घरबसल्या तुमच्या शिधापत्रिकेची स्थितीही तपासू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे नाव जरी शिधापत्रिकेत समाविष्ट केले नसले तरीही समाविष्ट करू शकता. तुम्ही राज्य सरकारच्या वेबसाइटवरूनही ई-रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

ऑनलाइन अर्ज करण्यसाठी

येथे क्लिक करा 

शिधापत्रिका बनवण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले ओळखपत्र, हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे रेशनकार्ड बनवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून देता येईल. याशिवाय पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्ता पुरावा, वीज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडेकरार इत्यादी काही कागदपत्रे आवश्यक असतील.

डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुक्रमे 3,2,1 रुपये प्रति किलो दराने पुरवते. सरकारने ठरवले आहे की डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्णपणे मोफत असेल.