नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रत्यक्ष शेतकरी हा काही ना काही समस्यांना तोंड देऊन शेती करत असतो आणि त्यातच आणखी एक खूप मोठी पंचायत होऊन जाते ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हा चांगला नसतो कारण अशा वेळेस आणि काढणीला आलेले पीक शेताबाहेर काढता येत नाही.
आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भांडण तंटे होत असतात तर शेतकरी बांधवांना आजच्या आपण कायदेशीर रित्या रस्ता कसा मिळवायचा हेच बघणार आहे त्यासाठी कायदेशीर रित्या रस्ता मिळवण्या साठी तुम्हाला तहसीलदारा कडे लेखी स्वरूपात तहसीलदार यांच्या नावाने हा अर्ज करावा लागणार आहे. त्या अर्जा मध्ये तुम्हाला तुम्ही कशाच्या आधारे अर्ज करतात ते नमूद करावे लागेल आणि या अर्थाचा विषयांमध्ये तुम्हाला असे लिहायचे की शेतात येण्या जाण्यासाठी जमिनीचा बांधावरून कायम स्वरूपी रस्ता मिळवण्या बाबत आणि त्यानंतर बघूया अर्जदाराची त्यामध्ये कोणकोणती माहिती द्यावी लागेल
त्या अर्जामध्ये अर्जदाराचे नाव गाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आणि त्यानंतर अर्जदाराला आपल्या शेताची माहिती द्यायची आहे त्यामध्ये गट क्रमांक अर्जदाराकडे किती शेती आहे आणि अर्जदाराची शेती जर एकत्र आणि सामूहिक असेल तर अर्जदाराच्या वाटेला किती शेती येत आहे आणि त्यानंतर अर्जदारा च्या जमिनी शेजारी कोणा कोणाची शेती आहे आणि त्या शेतकऱ्याचे नाव आणि पत्ता अशी माहिती द्यावी लागेल
त्या माहिती मध्ये अर्जदारा च्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यां च्या जमिनी आहे त्यांचे नाव आणि संपूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्याला शेतामध्ये रस्ता पाहिजे आहे त्या अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा लागेल अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याचा बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा द्यावा लागणार आहे
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर
जर अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर तारखेचे कागदपत्रासह संपूर्ण माहिती द्यावी लागेल आणि शेजारील शेतकऱ्यांची नावे पत्ते आणि त्यांच्या जमिनीची माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर रस्त्याचे गरज आहे का याची पाहणी केली जाते. land record शेजारील शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते अर्जदाराला खरोखरच रस्त्याची गरज आहे का असे तहसीलदार कडून प्रत्येकच्या पाणी केली जाते सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार क्षेत्र रस्ता मागणीचा अर्जावरती निर्णय घेतात जर खरोखरच रस्त्याची गरज असली तर तहसीलदाराकडून शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर शेतकऱ्याला रस्ता दिला जातो हा रस्ता आठ फूट रुंदीचा मंजूर केला जातो.