Kanda Anudan GR राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते दि.३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेत (रू. ७०,०००/- च्या मर्यादेत) प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
सदर अनुदानासाठी रू.५५० कोटी ( अक्षरी रूपये पाचशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम सन २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी प्रथमत: रू.४६५.९९ कोटी (अक्षरी रूपये चारशे पासष्ट कोटी, नव्व्यान्नव लाख फक्त) इतकी रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली होती.
सबब शासन निर्णय दिनांक ३० ऑगस्ट २०२३ अन्वये प्रथम टप्प्यात रू. १०.०० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या १४ जिल्हयातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदान व उर्वरित १० जिल्हयातील लाभार्थ्यांना रू.१०,०००/- इतक्या मर्यादेत अनुदान वितरणाचा तसेच शासन पत्र दिनांक १५.०९.२०२३ अन्वये दुस-या टप्प्यात सदर १० जिल्हयातील लाभार्थ्यांना अजून रू.१०,०००/- इतक्या मर्यादेत ( प्रथम टप्प्यात वितरीत केलेले रू.१०,०००/- अनुदान वगळून) अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.